जात (कविता)
जात मारते काहींना
जात तारते काहींना
जात जवळ आणी
फक्त जातीतल्या माणसांना.
मने नासवते जात
रक्त पेटवते जात
जात संपवून टाकी
माणसाच्या माणुसकीला.
जात संपतही नाही
जात संपवत राही
जात सुरुंग लावी
समतादी मूल्यांना.
अशी कशी ही जात
हिने देश केला खाक
हिने लावलेली आग
कशी विझता विझेना.
Nice sir...
ReplyDeleteजात म्हणजे जात नाही ती जात.
ReplyDeleteवास्तवावर भाष्य करणारी कविता
ReplyDeleteवास्तव
ReplyDeleteखूप छान. वास्तववादी कविता.
ReplyDelete