Pages

Tuesday, November 19, 2019

विचार

' विचार' बंदिस्त झालेत
छोट्या-छोट्या तळ्यांमध्ये
अडवले गेलेत
छोट्या- मोठ्या तटबंद्यांमध्ये

कालवे काढून विचारांचे पाणी
'विशिष्ट' दिशेनेच वळवलं गेलंय.

हे पाणी जितकं वाहतं राहिल
विविध प्रवाह, धारा 
जितक्या प्रमाणात सामावून घेईल
तितकं ते व्यापक, संथ, शांत होईल.

 (२०.११.२०१६)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com

Mob. No. 9623092113

3 comments: