मी काँग्रेसी नाहीये. मात्र माझा CAA या कायद्यातील संविधानविरोधी गोष्टींना विरोध आहे. मी अंतर्बाह्य भारतीय बनण्याचा पूर्णत: प्रयत्न करीत आहे (जात, धर्मनिरपेक्ष, भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा इ. देशहिताविरूद्ध गोष्टींपासून मुक्त होण्याचा). यांच्या अर्बन नक्षली या व्याख्येत मी बसतो का मग?
नोटाबंदीच्या वेळेसही विरोध करणाऱ्यांना असंच देशद्रोही ठरविण्यात आले होते. परिणाम काय झाले? ते सर्वांसमोर आहेत. काळा पैसा तर मिळाला नाहीच; परंतु भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊन गेली. देशाचे प्रचंड नुकसान झाले. कोट्यावधी लोकांचा रोजगार गेला. युवक उच्चशिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरत आहेत. नोटाबंदीने दहशतवाद्यांचा पूर्णतः बंदोबस्त होईल, असे सांगितले गेले होते. परंतु त्यानंतरही पुलवामासारखी घटना याच सरकारच्या काळात घडली.
या गंभीर आर्थिक विषयांकडे लक्ष न देता जात व धर्म या गोष्टींच्या आधारे कायदे बनवले जात आहेत. विरोध केला तर त्यांना अर्बन नक्षली, काँग्रेसी असे ठरविण्यात येत आहे.
सरकार कोणतेही असो त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा, चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा त्याच देशातील नागरिकांना अधिकार नसतो का? लोकांच्या याच अधिकारांचा राष्ट्रवादाच्या नावाखाली संकोच केला जात असल्याने जे काही चाललेले आहे, ते लोकशाहीविरोधी, माणुसकीविरोधी व संविधाविरोधी आहे, एवढे मात्र नक्की.
CAA विरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसरवत आहेत - नरेंद्र मोदी
http://dhunt.in/7SXSt?s=a&ss=pd
Source : "लोकमत" via Dailyhunt
No comments:
Post a Comment