Pages

Wednesday, December 25, 2019

माझ्यातला भारत

संविधान हा माझ्या 
आत्म्याचा हुंकार आहे
संविधानाचा सरनामा 
माझ्या जगण्याचा गाभा आहे.

माझ्यात एक भारत आहे
मीही एक भारत आहे
कोण कसा आहे
मला काय करायचे
माझ्यातल्या भारताला 
मला आहे जपायचे

मी हिंस्त्र भारत हिंस्त्र
मी भ्रष्ट भारत भ्रष्ट
मनातले हे तण म्हणून
आहे उपटून टाकायचे 
माझ्यातल्या भारताला 
समृद्ध, संपन्न आहे करायचे

© copyright

डॉ. राहूल रजनी


Mob. No. 9623092113


6 comments: