Pages

Thursday, January 23, 2020

सूत्रसंचालन- नमूना १


वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

२०१८-१९



सुस्वागतम! सुस्वागतम! सुस्वागतम!


शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. आजच्या या समारंभात गेल्या वर्षभरात महाविद्यालयात व महाविद्यालयाच्या बाहेर आंतर्महाविद्यालयीन, विद्यापीठ पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा विभागातून ज्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष  २०१७-१८ मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आज या ठिकाणी समारंभाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार आहे.

या समारंभप्रसंगी अध्यक्ष म्हणून आपल्याला गोखले एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राचार्य श्री. बा. पंडित सर हे लाभलेले आहेत. तर

प्रमुख अतिथी म्हणून                                                              ,

रोटरी क्लब, Boisar चे संचालक, मा. श्री. नारायणजी मोहिते,

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक मा. डॉ. दिलीप पाटील

तसेच मा. श्री. विनयकुमार आवटे,

मा. डॉ. दत्तात्रय पवार, प्राचार्य, कीर्ती महाविद्यालय, मुंबई,

मा. श्री. कृष्णा गौरप्रभू,

मा. डॉ. रामदास मराड, अधीक्षक, पतंगशाह कुटीर रुग्णालय, जव्हार

मा. श्री. विनोद मराठे

मा. डॉ. धनेश कलाल, शाखा सचिव, जव्हार युनिट

हे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत.

तसेच महाविद्यालयाच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य श्री दिनेशजी भट, श्री दिलीपजी तेंडुलकर हे देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त विचारमंचावर आसनस्थ झालेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम, उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील तसेच माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी डॉ. राहुल पाटील आणि मी प्रा. चेतन पवार आपले सहर्ष स्वागत करीत आहोत.

 



स्वागत गीत

 मित्रहो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागतगीताने करणार आहोत. महाविद्यालयाचे विद्यार्थी आता आपल्यासमोर छानसे स्वागत गीत सादर करतील.





दीपप्रज्वलन

मित्रांनो, भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनiने केली जाते. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की, त्यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करावे.





प्रास्ताविक

यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांना निमंत्रित करतो.





प्रमुख अतिथींचा परिचय व सत्कार

 मित्रांनो, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्याकडे आलेल्या अतिथींचे यथोचित स्वागत व सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे. यानंतर आपण माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय करून घेऊयात.

1)      आदरणीय प्राचार्य श्री. बा. पंडित सर. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली संस्था गेल्या पन्नास वर्षांपासून मार्गक्रमण करीत असताना भरभराटीला आलेली आहे. त्यांना महात्मा गांधी व युगपुरुष विनोबा भावे यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला असून आयुष्यभर या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार ते करीत आलेले आहेत. त्यांनी विविध विषयांवरच्या अनेक पुस्तकांचे लेखनही केलेले आहे. असे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री. पंडित सर यांचा सत्कार मा. श्री. राजेंद्रजी गावित  यांनी करावा, अशी मी त्यांना विनंती करतो.

2)      मा. श्री. राजेंद्रजी गावित हे पालघर मतदार संघाचे लोकनियुक्त खासदार असून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव असे योगदान असून आदिवासी समाजाच्या विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीशी  तसेच आपल्या महाविद्यालयाशी त्यांचे नेहमीच स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पंडित सर यांना विनंती करतो की, त्यांनी गावित  साहेबांचा सत्कार करावा.


3)      मा. श्री. नारायण मोहिते. संचालक, रोटरी क्लब, बोईसर. मोहिते सर यांना शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणाच्या क्षेत्रात विशेष रस असून महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने 27 जुलै 2018 रोजी आयोजित केलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोहिते सरांच्या प्रेरणेने व पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला होता. आपल्या महाविद्यालयाशी त्यांचे खूपच जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याकडून नेहमीच आपल्याला सहकार्य मिळत आहे. मी डॉ. धनेश कलाल यांना विनंती करतो की, त्यांनी श्री. नारायण मोहिते यांचा सत्कार करावा.



4)      मा. डॉ. दिलीप पाटील. शिक्षण बीए अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, ग्रामीण विकास. एलएलबी, एम बी ए, पीएचडी. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे ते संचालक आहेत. सेंट जोसेफ महाविद्यालय विरारचे प्राचार्यपद त्यांनी तीन वर्ष भूषविलेले आहे. एम फिलच्या 20 व पीएचडीच्या 7 विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. 2004 मध्ये अमेरिकेच्या इंटरनॅशनल रोटरी फाउंडेशनतर्फे 10 उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्यात आली होती, त्या शिक्षकांपैकी सर एक होते. विविध विषयांवरील एकूण 10 पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. मुंबई विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. विविध समित्यांवर अध्यक्ष व सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. आपल्या महाविद्यालयाशी गेल्या 34 वर्षांपासून त्यांचे ऋणानुबंध आहेत. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मेश्राम सर यांना विनंती करतो की, त्यांनी आदरणीय दिलीप पाटील यांचा सत्कार करावा.



5)      मा. श्री. विनयकुमार आवटे. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जपान दौऱ्यातील सल्लागार. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे प्रचार व प्रसार करण्याचे कार्य ते करीत आहेत. भारत सरकारच्या स्किल इंडिया या प्रकल्पाचे ते संचालक आहेत. इतर देशातील तंत्रज्ञान भारतात लागू करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते कॉर्डिनेटर आहेत. गेल्या महिन्यात आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जपानमधून ऑनलाइन स्वरूपात आजचा युवक आणि उद्योजकता या विषयावर उद्बोधक असे व्याख्यान दिले.  मी कलाल सरांना विनंती करतो की, त्यांनी विनयकुमार आवटे यांचा सत्कार करावा.

  
6)      प्रा. डॉ. दत्तात्रय पवार. ते पुण्यातील प्रतिष्ठित अशा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद आहेत. दादर येथील कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची निवड झालेली असून ग्रामीण विकास हा त्यांचा विषय आहे. पीएचडीचे मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विषयाच्या परीक्षा विभागाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे. देश-परदेशात अनेक परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध वाचले आहेत. आपल्या महाविद्यालयाशी 1985 सालापासून त्यांचे स्नेहपूर्ण संबंध असून मुंबई विद्यापीठात महाविद्यालयाच्या अनेक कामांमध्ये त्यांचे सदैव मोलाचे सहकार्य मिळत असते. मी मेश्राम सरांना विनंती करतो की, त्यांनी प्रा. डॉ. दत्तात्रय पवार यांचा सत्कार करावा.



7)      मा. श्रीकृष्ण गौरप्रभू हे गालतरे येथील गोवर्धन इको फ्रेंडली विलेजमध्ये आध्यात्मिक प्रवचन व विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्याचे कार्य करतात. जव्हारमधील गोवर्धन इको फ्रेंडली प्रकल्पाचे ते समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. मी कलाल सरांना यांना विनंती करतो की, त्यांनी मा. श्रीकृष्ण गौरप्रभू यांचा सत्कार करावा.



8)      यानंतरचे आपले अतिथी रुग्णसेवेचा वसा घेतलेले मा. डॉ. रामदास मराड हे जव्हार येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. जव्हार परिसरात त्यांनी आरोग्य या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना पालघरभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरांमध्ये दरवर्षी ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या सहकार्याने आपण अनेकदा रक्तदान शिबिरांचे तसेच सिकलसेल व हिमोग्लोबिन तपासणी शिबिरांचे आयोजन केलेले आहे. मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पी एम भागडे सर यांना विनंती करतो की, त्यांनी मराड सरांचा सत्कार करावा.



9)      मा. श्री. विनोद मराठे हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. या क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय असे कार्य आहे.  मी  महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करतो की, त्यांनी मा. श्री. विनोद मराठे यांचा सत्कार करावा.



10)   मा. श्री. दिनेश भट. जव्हार नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष. जव्हार महाविद्यालयाच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य. जव्हार महाविद्यालय व जव्हार शहराच्या विकासामध्ये त्यांचे भरीव असे योगदान आहे. जनकल्याण बँकेचे ते संस्थापक संचालक असून ते अर्बन बँकेचेही संचालक आहेत. विद्यार्थीप्रिय व लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. मी  भागडे सरांना विनंती करतो की, त्यांनी  मा. श्री. दिनेश भट यांचा सत्कार करावा.



 11)  मा. श्री. दिलीप तेंडुलकर. जव्हार नगरपरिषदेचे माजी नगरसेवक. महाविद्यालयाच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य. एक यशस्वी उद्योजक. तसेच महाविद्यालय व जव्हार परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसाठी उदार हस्ते आर्थिक सहकार्य ते करीत असतात. मितभाषी, मनमिळावू व कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. मी कलाल सरांना विनंती करतो की, त्यांनी मा. श्री. दिलीप तेंडुलकर यांचा सत्कार करावा.



 12)   मा. प्राचार्य डॉ. धनेश कलाल हे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जव्हार युनिटचे शाखा सचिव असून आपल्या जव्हार महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. सध्या ते संस्थेच्या नाशिक रोड येथील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. नैक पियर टीमचे सदस्य म्हणून त्यांनी भारतातील अनेक महाविद्यालयांचे मूल्यांकन केलेले आहे. प्रशासक म्हणून काम पाहताना विद्यार्थी व प्राध्यापकांच्या समस्या, सुखदुःख यात आपुलकीने ते समरस होतात. मी माननीय खासदार गावित सरांना विनंती करतो की, त्यांनी कलाल सरांचा सत्कार करावा.



13)   यानंतरचे सत्कारमूर्ती  महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अर्थशास्त्र विषयाचे विभागप्रमुख आदरणीय डॉ. पी. एम. भागडे सर. या महाविद्यालयात ते  1985 पासून कार्यरत असून त्यांनी 10 वर्षे प्रभारी प्राचार्यपद भूषविलेले आहे. महाविद्यालयाच्या गेल्या 35 वर्षांतील विकास व वाटचालीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते यावर्षी 30 एप्रिल 2019 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मी आदरणीय पंडित सरांना विनंती करतो की, त्यांनी भागडे सरांचा सत्कार करावा.



14)  यानंतरचे सत्कार मूर्ती ज्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय प्रगतीपथiकडे वाटचाल करीत आहे असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्रामसर.  ते गोखले एज्युकेशन सोसायटीचे आजीव सभासद असून निसर्गप्रेमी व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. मी गावित सरांना विनंती करतो की, त्यांनी  मा. प्राचार्यांचा यांचा सत्कार करावा.

 

माजी विद्यार्थी व शुभचिंतकांचे स्वागत व सत्कार

1)      सर्वप्रथम श्रीमती मनीषा भोये या जव्हारमधील विद्यावर्धिनी गॅस एजन्सीच्या संचालिका आहेत. यशस्वी महिला उद्योजिका म्हणून त्या सर्वपरिचित आहेत. त्यांनी मराठी विषय घेऊन आपल्या महाविद्यालयामधून पदवी घेतलेली असून महाविद्यालयाच्या विकासासाठी त्यांनी 25 हजार रुपये आर्थिक सहाय्य केलेले आहे. मी माननीय खासदार गावित सरांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती मनीषा भोये यांचा सत्कार करावा.

 2)      यानंतर मा. श्री. अर्जुन सुरूम हे देखील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. विक्रमगड येथील गीतांजली गॅस सर्विसचे ते संचालक आहेत. उद्या महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित केल्या जात असलेल्या उडान महोत्सवाच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. तसेच एनएसएसच्या शिबीर प्रसंगी त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. मी ------------------------------------------ यांना विनंती करतो की त्यांनी श्री सुरूम यांचा सत्कार करावा.

3)      यानंतरचे सत्कारमूर्ती मा. श्री. विजय पारधी. हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून जव्हारमधील ऐयना येथील ते रहिवाशी आहेत. व्यवसायाने ते कॉन्ट्रॅक्टर असून आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या सहलीसाठी त्यांनी 10000 रुपयांचे आर्थिक सहाय्य केलेले आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी श्री. विजय पारधी यांचा सत्कार करावा.

4)      मा. श्री. सय्यद माहीम मणियार हे जव्हारमधील प्रतिष्ठित नागरिक असून त्यांना समाजकार्याची आवड आहे. त्यांनी आपल्या महाविद्यालयातील जलसंवर्धन प्रकल्पासाठी 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केलेले आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मनियार यांचा सत्कार करावा.

 

5)      मा. श्री. मिलिंद थत्ते. वयम चळवळीचे संस्थापक. महाविद्यालय व वयम यांनी संयुक्तरीत्या जव्हार तालुक्यातील आदिवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना धडपड प्रयोगशाळा या उपक्रमाअंतर्गत विज्ञान विषय शिकवण्याचे कार्य केले. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की त्यांनी श्री. मिलिंद थत्ते यांचा सत्कार करावा.

6)      मा. श्री. नितीन दत्तात्रय भगत हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी महाविद्यालयामध्ये वाणिज्य या विषयाचे अध्यापन कार्यही केलेले आहे. ते जव्हारमधील प्रसिद्ध व्यावसायिक असून महाविद्यालयातील विविध उपक्रम व एनएसएसच्या शिबिरप्रसंगी त्यांचे मोलाचे सहकार्य दरवर्षी मिळत असते. मी……………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी श्री भगत यांचा सत्कार करावा.

 7)      मा. श्री. अशोक राऊत हे कोगदा या गावाचे सरपंच असून गेल्या चार वर्षापासून ते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरप्रसंगी सहकार्य करत आलेले आहेत. तसेच जल व्यवस्थापनासाठी त्यांनी सहाय्य केलेले आहे. ते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी श्री. अशोक राऊत यांचा सत्कार करावा.

 8)      मा. श्री. संतोष धोडी. चेतन झेरॉक्सचे संचालक. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी माफक दरात झेरॉक्स करून देतात. त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या विकासासाठी 3011 रुपयांचे आर्थिक सहाय्य केलेले आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी श्री. संतोष धोडी यांचा सत्कार करावा.

 9)      मा. श्री. प्रशांत मोरे. जव्हार मधील यशस्वी उद्योजक व्यावसायिक. अय्यंगार बेकरीचे प्रमुख. त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या विकासासाठी 3011 रुपयांचे आर्थिक सहाय्य केलेले आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी श्री. प्रशांत मोरे यांचा सत्कार करावा.



10)  मा. श्री. अजय सोनवणे हे जव्हारमधील प्रतिष्ठित नागरिक असून जव्हार नगरपरिषदेचे अधिकृत कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी महाविद्यालयातील जलसंवर्धनाच्या प्रकल्पासाठी 5000 रुपयांचे आर्थिक सहाय्य केलेले आहे, मी ……………………यांना विनंती करतो की त्यांनी श्री. सोनवणे यांचा सत्कार करावा.




 11)  प्रा. वीरेंद्र चंपानेरकर. गणित विषयाचे महाविद्यालयाचे माजी अध्‍यापक. गणित हा विषय ते विदेशातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवतात. हाच प्रकल्प ते महाविद्यालयासोबत राबवित आहेत. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी प्रा. वीरेंद्र चंपानेरकर यांचा सत्कार करावा.



वर्षभरात विशेष कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान

त्यानंतर वर्षभरात विशेष कार्य करणाऱ्या व विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.

1.      महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अनिल पाटील.

या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रतिष्ठित अशा नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी ..................... रुपयांचे आर्थिक साहाय्य केले आहे.  याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी ………………………………………  यांचा सत्कार करावा.

  

2.      डॉ. प्रज्ञा कुलकर्णी

नाशिकच्या इनर विल क्लबकडून सहयोगीनी 2018 हा पुरस्कार त्यांना नुकताच प्राप्त झाला. तसेच महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे संयोजक म्हणून त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली. याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी ………………………………………  यांचा सत्कार करावा.



 3.      प्रा. वसंत धांडे

हे महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक असून गेली कित्येक वर्षे ते परीक्षा विभागाची जबाबदारी सक्षमरीत्या सांभाळत आहेत. ते विज्ञान विभागाचे तसेच आय एस ओ चे समन्वयक देखील आहेत. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की त्यांनी धांडे सरांना सन्मानित करावे.



 4.      प्रा. शैलेश बगडाने

या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रतिष्ठित अशा नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी या महत्त्वाच्या समितीचे ते समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली त्याचे ते सहसंयोजक होते. तसेच मराठी व इंग्रजी विभागाची सहल आयोजित करण्यात आली त्यात त्यांचा पुढाकार होता. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की त्यांनी बगडाने सरांना सन्मानित करावे.

 

5.      डॉ. राहुल पाटील

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधून पीएचडी पदवी संपादित केली

मुंबई विद्यापीठाकडून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून पुरस्कार प्रदान

एनएसएसच्या पालघर जिल्ह्याचे एरिया कॉर्डिनेटर म्हणून नेमणूक

एन एस एस अंतर्गत दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

नाशिक येथील व्ही एन नाईक महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून तर पालघर जिल्ह्यातील आठ महाविद्यालयांच्या शिबिरांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून निमंत्रित. तसेच

या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रकाशित झालेला आहे.

मी कलाल सर यांना विनंती करतो की त्यांनी राहुल पाटील सरांना सन्मानित करावे.


6.      प्रा. अनंत आवळे

या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रतिष्ठित अशा नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. तसेच त्यांनी   महाविद्यालयातील जलव्यवस्थापन प्रकल्पासाठी आर्थिक सहकार्य मिळवून दिले व हेमलकसा येथे ट्रीप आयोजित केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी ……………………  यांना विनंती करतो की त्यांनी आवळे सरांना सन्मानित करावे.



 7.      श्री मच्छिंद्र वाकचौरे

महाविद्यालयात ग्रंथपाल या पदावर कार्यरत असून या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रतिष्ठित अशा नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. मी ……………………  यांना विनंती करतो की त्यांनी ……………………  सरांना सन्मानित करावे.



8.      प्रा. कांतीलाल पाटील. या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रतिष्ठित अशा नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. जलसंवर्धन प्रकल्पासाठी  त्यांनी स्वयंस्फूर्तीने ...................... रुपयांचे आर्थिक साहाय्य केले, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. मी ……………………  यांना विनंती करतो की त्यांनी ……………………  सरांना सन्मानित करावे.


9.      प्रा. विनायक खातळे. या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रतिष्ठित अशा नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. जलसंवर्धन प्रकल्पासाठी स्वयंस्फूर्तीने त्यांनी ........................ रुपयांचे आर्थिक साहाय्य केले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. मी ……………………  यांना विनंती करतो की त्यांनी ……………………  सरांना सन्मानित करावे.


10. डॉ. कीर्ती कुलकर्णी. या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रतिष्ठित अशा नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे.  तसेच याच वर्षी त्यांच्यावर सांस्कृतिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आणि त्यांनी ती उत्कृष्टरीत्या पार पाडली, याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी ……………………  यांना विनंती करतो की त्यांनी ……………………  सरांना सन्मानित करावे.
  
11.  डॉ. महेश मुद्गल.

त्यांनी लिहिलेले Environmental Management and Zoo geography हे पुस्तक मुंबई विद्यापीठाने विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केलेले आहे.

त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये दोन शोधनिबंधाचे वाचन केलेले आहे.

2 नियतकालिकांच्या एडिटोरियल बोर्डचे सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत. त्यापैकी एक अमेरिकेमधून प्रकाशित होते.          

तसेच मुंबई विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विषयाच्या लेखन समितीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे.

मी ……………………  यांना विनंती करतो की त्यांनी ……………………  सरांना सन्मानित करावे.



11.  प्रा. अभिजीत बांबरे

महाविद्यालयात वारली पेंटिंगच्या प्रशिक्षणासाठी दालन सुरू करण्यात आले आहे. या विभागाचे ते समन्वयक आहेत. मी ……………………  यांना विनंती करतो की त्यांनी ……………………  सरांना सन्मानित करावे.



12.  श्री प्रकाश कोकाटे. 1992 मध्ये  जव्हार महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पदोन्नती होत होत ते सध्या कार्यालयीन अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. सलग 26 वर्षे सेवा देऊन जून 2019 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत. मी …………………………. अशी विनंती करतो की, त्यांनी या प्रसंगी त्यांना सन्मानित करावे.



13.  श्री किरण चौरे - 1985 मध्ये संस्थेत कनिष्ठ लिपिक या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. सन 2008 पासून ते जव्हार महाविद्यालयामध्ये मुख्य लिपिक या पदावर कार्यरत आहेत. 31 मार्च 2019 रोजी 35 वर्ष सेवा देऊन ते सेवानिवृत्त होत आहेत. मी …………………………………..यांना विनंती करतो की त्यांनी चौरे सरांना सन्मानित करावे.



आदर्श प्राध्यापक व आदर्श शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार


                   विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी महाविद्यालयातील प्राध्यापकांना त्यांनी त्या त्या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आदर्श प्राध्यापक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान केला जातो. 2018-19 या शैक्षणिक वर्षातील आदर्श प्राध्यापक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार आता या ठिकाणी माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

 या वर्षाच्या आदर्श प्राध्यापक पुरस्काराचे मानकरी आहेत डॉ. विजय शंकर शिंदे.

1.      नोव्हेंबर 2011 मध्ये अर्थशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापकपदी त्यांची नियुक्ती झाली. 2012 पासून ते महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक म्हणून सक्षमरीत्या जबाबदारी सांभाळत असून पालघर विभागाचे एरिया कॉर्डिनेटर म्हणूनही कार्यरत आहेत.  तसेच 2012 पासूनच परीक्षा विभागामध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत असून विभागाच्या कामकाजामध्ये त्यांनी नाविन्यता आणलेली आहे. त्यांनी 2 पुस्तकांचे लेखन केलेले असून अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंधांचे वाचन केलेले आहे. मनमिळावू व सहृदय प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थीप्रिय आहेत.



मी …………………………………..यांना विनंती करतो की त्यांनी डॉ विजय शिंदे यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करावा





तसेच आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराचे मानकरी आहेत श्री. गणेश शिंदे. 
ते 2006 पासून महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. एन एस एस, परीक्षा विभाग  या विभागांमध्ये त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. त्यांच्यावर सोपविलेले कोणतेही काम ते अतिशय जबाबदारीने व उत्कृष्ट रित्या पार पाडीत असतात. अतिशय मनमिळावू व कामसू स्वभाव, विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. मी …………………………………..यांना विनंती करतो की त्यांनी शिंदे यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करावा.





पुस्तक प्रकाशन सोहळा

मित्रांनो, आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक अध्यापन व ज्ञानदानासोबत संशोधन व लेखनकार्यही करीत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते आता या ठिकाणी संपन्न होणार आहे.



1.      सर्वप्रथम महाविद्यालयाचे वार्षिकांक उत्कर्षचे प्रकाशन माननीय खासदार श्री राजेंद्र गावित यांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करतो. महाविद्यालयाच्या वर्षभराच्या घडामोडी, विद्यार्थ्यांचे लेखन, प्राध्यापकांची विविधांगी कामगिरी या सर्वांचा आलेख उत्कर्षमध्ये आलेला असतो. उत्कर्ष म्हणजे महाविद्यालयाचे लिखित स्वरूपातील प्रतिबिंबच.



2.      यानंतर डॉ. हेमंत मुकणे लिखित जव्हार संस्थान ची शोधयात्राचरित्र कुंचल्यातील रंग-रेषा या दोन पुस्तकांचे प्रकाशन माननीय पंडित सरांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करतो. या पुस्तकांमधून जव्हार संस्थानचा इतिहास तसेच जव्हार तालुक्यात जी लोकोत्तर व्यक्तिमत्वे होऊन गेलेली आहेत, त्यांच्या कार्याची ओळख मुकणे सरांनी करून दिली आहे.



3.      डॉ. पवन कुमार मुडबे यांनी प्राणिशास्त्र या विषयाच्या प्रथम वर्ष विज्ञान या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले पापुलेशन अँड नेचर स्टडिज हे पुस्तक मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकांचे प्रकाशन माननीय दिलीप पाटील सरांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करतो.

तसेच ते मुंबई विद्यापीठाच्या लेखन समितीचे सदस्य.

मुंबई विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे परीक्षक.

मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम मंडळ सदस्य.

इंडियन सायन्स काँग्रेसचे आजीव सभासद.

4.      
 यानंतर आमच्या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री सुनील वाघ यांच्या हस्तलिखित पुस्तिकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकांचे प्रकाशन माननीय मोहिते सरांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करतो. श्री. वाघ यांना सुविचारांचे संकलन करण्याचा छंद आहे. त्यांनी हजारो सुविचारांचे संकलन हस्तलिखित स्वरूपात केले असून याअगोदर त्यांच्या तेरा हस्तलिखित सुविचारांच्या पुस्तिका प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तिका त्यांनी शाळा-महाविद्यालये वाचनालय सामाजिक संस्थांना विनामूल्य दिलेल्या आहेत. या पुस्तिकांचा उपयोग फलक लेखन, शुभेच्छापत्रे, ललित लेखन व व्यक्तिमत्त्व विकासासाठी होत असतो. आज त्यांच्या हस्तलिखित संकलित सुविचारांची चौदावी पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत असतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.



  अहवाल वाचन

यानंतर गेल्या वर्षभरात महाविद्यालयात आयोजित केल्या गेलेल्या विविध उपक्रमांचा आढावा आपल्या अहवालातून आपणासमोर मांडण्यासाठी मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. एम. भागडे यांना निमंत्रित करतो.



मान्यवरांचे मनोगत

                  मित्रहो, आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथीचा परिचय झालेला आहे. यावरून त्यांच्या कार्यकर्तुत्वाची आपल्याला माहितीच झालेलीच आहे. अशा कर्तुत्ववान व्यक्तींकडून आपल्याला बरेच काही शिकायला मिळत असते. त्यांचे विचार हे यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरत असतात.



तेव्हा आजच्या या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मी मा. श्री. कृष्णा गौरप्रभू  यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे



मा. श्री. दत्तात्रय पवार





मा. श्री. विनयकुमार आवटे



माननीय डॉक्टर दिलीप पाटील



मा श्री नारायण मोहिते





मा. श्री. राजेंद्रजी गावित

अध्यक्षीय भाषण

आजच्या समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय …………………………………………… .. यांना अध्यक्ष भाषण करण्याची मी विनंती करतो.



पारितोषिक वितरण समारंभ यादी वाचन

यानंतर कार्यक्रमाच्या ज्या भागाची तुम्ही फार उत्सुकतेने वाट पाहत आहात, त्या भागाकडे आपण वळत आहोत. वेगवेगळ्या स्पर्धा व परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आता या ठिकाणी होणार आहे. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या नावाची यादी वाचण्यासाठी मी माझे सहकारी डॉ. विजय शिंदे व डॉ. बी. व्ही. पवार यांना निमंत्रित करतो.

आभार

आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत. या समारंभप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर आपला अमूल्य असा वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित राहिले आहेत. त्यांनी आपल्याला अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी मी डॉ. अनिल पाटील यांना निमंत्रित करतो.


राष्ट्रगीत 
   कार्यक्रमाची सांगता


4 comments: