Pages

Friday, November 22, 2019

मी



कधीकधी माझ्याचकडे मी
तटस्थपणे बघतो 

माझ्यातच मला
कधीही न भेटलेला
दुसराच मी गवसतो 

त्याच्याशीच गप्पा मारण्यात
वेळ माझा निघून जातो
नंतर दुसऱ्या क्षणी
दुसरा मी’…  

असे कित्येक दिवस माझे
माझ्याशीच संवाद साधण्यात
निघून गेले, आता
माझे आप्त, मित्र 
माझ्यावर नाराज आहेत 

(०९/१०/२००७)

© copyright

डॉ. राहूल रजनी
 
 
Mob. No. 9623092113

4 comments:

  1. स्वतःचा शोध माणसाने नक्कीच घ्यावा.
    तेंव्हाच कळत आपण काय आणि कुठे आहेत.
    खुप सुंदर कविता आहे सर.
    👌👌👌💐🌹

    ReplyDelete