कधीकधी माझ्याचकडे मी
तटस्थपणे बघतो
माझ्यातच मला
कधीही न भेटलेला
दुसराच ‘मी’ गवसतो
त्याच्याशीच गप्पा मारण्यात
वेळ माझा निघून जातो
नंतर दुसऱ्या क्षणी
दुसरा ‘मी’…
असे कित्येक दिवस माझे
माझ्याशीच संवाद साधण्यात
निघून गेले, आता
माझे आप्त, मित्र
माझ्यावर नाराज आहेत
(०९/१०/२००७)
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113
छान...
ReplyDeleteछान
ReplyDeleteस्वतःचा शोध माणसाने नक्कीच घ्यावा.
ReplyDeleteतेंव्हाच कळत आपण काय आणि कुठे आहेत.
खुप सुंदर कविता आहे सर.
👌👌👌💐🌹
छान
ReplyDelete